Now Loading

बदलापूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची* प्रतिष्ठापना, बुद्धविहार स्तुप तसेच भिक्खू निवास इमारतीचे उदघाटन आज बुद्धजयंती दिनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, सोनिवली, बदलापूर येथे आ. किसन कथोरेजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वास्तुत तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना, बुद्धविहार स्तुप तसेच भिक्खू निवास इमारतीचे उदघाटन आज #बुद्धजयंती दिनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा, सुसज्ज ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कपिल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हा भव्य स्मारक साकारण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले नागपुरातील दीक्षाभूमीची हुबेहूब प्रतिकृती बदलापुरात साकारण्यात आल्याने या स्मारकासाठी आपली पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वान पर्यंत पोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बदलापूरच्या स्मारकासाठी केंद्राकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच आंबेडकर यांच्या पुतळ्याला भोवती सुशोभिकरण करण्यासाठी 40 लाखांचा निधी तत्काळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी या स्मारकाबाबत यांचे मनोगत व्यक्त केले तर खासदार कपिल पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे, संभाजी शिंदे, शरद तेली, किरण भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.