हवामान अपडेट: नैऋत्येकडून मान्सूनची एन्ट्री, मैदानी भागात पारा घसरला, जाणून घ्या तुमच्या राज्याचे हवामान

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने नैऋत्य अंदमान आणि निकोबार बेटांवर दार एन्ट्री केली आहे. ट्रोपोस्फियरच्या खालच्या पातळीत नैऋत्य वाऱ्याचा जोर वाढल्याने लगतच्या भागात पाऊस पडत आहे. केरळमध्ये 27 तारखेला मान्सून दाखल होणार आहे. त्याचबरोबर येत्या चार-पाच दिवसांत केरळ, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयात मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडक ऊन आणि उकाडा सुरूच आहे. हवामान खात्यानुसार पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. यासह ते म्हणाले की, तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट लवकरच संपेल. यंदा मान्सून लवकरच देशात दाखल होणार आहे. हवामानातील बदलामुळे मैदानी भागात तापमानाचा पारा घसरला आहे. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. मात्र महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कधी एन्ट्री घेणार याची माहिती अद्यापपर्यंत हवामान खात्याने दिलेली नाही.
सविस्तर माहितीसाठी :- Maharashtra Times | News 18 | TV 9
ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा