Now Loading

ENG vs IND: कोविड-19 मधून बरा झाल्यानंतर आर अश्विन लीसेस्टरशायरमध्ये टीम इंडियामध्ये सामील

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे (IND vs ENG). इंग्लंडविरुद्धच्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) कोविड-19 मधून बरा झाल्यानंतर लीसेस्टरशायरमध्ये संघात सामील झाला आहे. टीम इंडिया १६ जूनला इंग्लंडला रवाना झाली होती. त्यावेळी अश्विन क्वारंटाईनमध्ये होता. मात्र आता तो सावरला असून मैदानात उतरला आहे. टीम इंडियाने लीसेस्टरशायर काऊंटी ग्राउंडवर सराव सामनाही सुरू केला आहे. यानंतर टीम इंडिया आणि इंग्लंड 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे कसोटी सामना खेळणार आहेत.

 

 

सविस्तर माहितीसाठी :-  Live Hindustan | MSN | Web Dunia 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा