Now Loading

भारतात कोरोनाव्हायरसच्या 17,073 नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 94,000 च्या वर

भारतात कोरोनाचा (Coronavirus) वाढता संसर्ग सरकार आणि लोकांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनचे BA.2, BA.4 आणि BA.5 हे उपप्रकार अडचणीत भर घालत आहेत. दरम्यान, देशात कोरोनाचे 17,073 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) म्हणण्यानुसार, या कालावधीत 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, रविवारी 11,739 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 25 लोकांचा मृत्यू झाला. आता देशातील कोविड-19 बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,34,07,048 झाली आहे. यापैकी 4,27,87,606 बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे एकूण 21 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 5,25,020 वर पोहोचली आहे. कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण देखील 1.21% पर्यंत वाढले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 94,420 आहे. आतापर्यंत देशातील 1,97,11,91 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :-  Money Control | Jagran ABP NDTV 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा