Now Loading

IND vs IRE: भारताने पहिला T20 सामना जिंकला, आयर्लंडवर 7 विकेट्सने मात करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली

भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना रविवारी रात्री द व्हिलेज येथे खेळला गेला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि काही वेळा अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सामना 12 षटकांचा करण्यात आला. यानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडच्या हॅरी टेक्टरच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 16 चेंडू बाकी असताना 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. पहिला सामना जिंकल्यानंतर संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मैदानावर मंगळवारी दुसरा आणि शेवटचा सामना होणार आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :-  News 18 | Live Hindustan Times Now

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा