Now Loading

Alia Bhatt Pregnancy: आलिया-रणबीर लवकरच आई-वडील होणार, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून दिली माहिती

बॉलिवूडचे क्यूट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या वर्षी लग्नगाठीत अडकले. आता अभिनेत्रीने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती अल्ट्रासाऊंड करत आहे आणि तिचा पती रणबीर तिच्या बाजूला बसला आहे. हा फोटो शेअर करत आलियाने लिहिले, "आमचे बाळ..... लवकरच येत आहे". ही पोस्ट समोर येताच चाहते आणि इंडस्ट्रीतील लोक त्याचे अभिनंदन करत आहेत. आलिया आणि रणबीर कपूर या वर्षी 14 एप्रिलला वांद्रे येथील आरके हाऊसमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाला फक्त त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. रणबीर आणि आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Divya Marathi | Maharashtra Today | Mumbai Live | Maharashtra Times

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा