Now Loading

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मासाठी कव्हर म्हणून मयंक अग्रवाल भारताच्या कसोटी संघात सामील

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. संघाचा कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होणार आहे. याआधी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली होती. संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोविड पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याला कसोटी खेळणे जवळपास अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने (BCCI) कर्णधार रोहित शर्माचे कव्हर म्हणून मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) भारताच्या कसोटी संघात समावेश केला आहे. मयंक अग्रवाल आज इंग्लंडला रवाना होणार आहे. रोहितच्या आधी अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि माजी कर्णधार विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण कोरोना प्रोटोकॉल पूर्ण करून आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो मैदानात उतरला आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Lokmat | Maharashtra Times | Hindustan Times | Sakal 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा