वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे सिंदखेड तालुक्यातील बेटावद परिसरातील नागरिक हैराण

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होणे हे समीकरण बनले आहे. त्यामुळे ऊन व पावसाचा वीज वितरण यंत्रणेवर काय परिणाम होतो असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्यास तासन् तास वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे विजेवर चालणारे व्यवसायाचे नुकसान होत आहे. तसेच बेटावद परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वीज वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष घालून विजेची समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.