Now Loading

केंद्राच्या अग्निपथ योजनेविरोधात धुळे येथे आमदार कुणाल पाटील यांचे धरणे आंदोलन

धुळे येथे केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात २७ जून रोजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी दिली. यासाठी सोमवारी दि 27 रोजी सकाळी १० वाजता सर्व विधानसभा क्षेत्रात धरणे आंदोलन करून अग्निपथ योजनेचा फोलपणा चव्हाट्यावर आणणार आहेत. जिल्ह्याभरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व तालुका कार्यक्रमातील सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारकडून सैन्य भरती प्रक्रिया साठी अग्निपथ या योजनेची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. त्याविरोधात काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येत आहे.