Now Loading

पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे गरजेचे

महाराष्ट्र शासनाच्या कृषी व आत्मा विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह दिनांक २५ जून ते १जुलै २०२२ दरम्यान साजरा होत आहे या सप्ताहाच्या उद्घाटनपर कार्यक्रम मौजे घारी येथे संपन्न झाला यावेळेस बियाणे पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे तसेच पेरणी ची पद्धतीमध्ये बदल करून बीबीएफ तंत्रज्ञानाचा व जोड ओळ पद्धतीचा वापर करावा असे मत कृषी उपसंचालक श्री मोरे यांनी यावेळी केले. तालुका कृषी अधिकारी श्री शहाजी कदम यांनी सोयाबीन उत्पादकता वाढीची अष्टसूत्री पद्धत सांगून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बीजप्रक्रिया, बीबीएफ यंत्र पेरणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवून व त्याची शास्त्रीय माहिती सांगून संपन्न झाला या वेळी मंडळ कृषी अधिकारी श्री सोमनाथ साठे, पर्यवेक्षक श्री सुधीर काशीद, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री कल्पक चाटी, कृषी सहायक सौ शिंदे, बायर कंपनी चे प्रतिनिधी श्री ढाकणे, पांगरी कृषी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच घारी पंचक्रोशीतील समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना कल्पक चाटी यांनी तर आभार प्रदर्शन श्री सधीर काशीद यांनी केले