Now Loading

मुंबई : कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली, आतापर्यंत 12 लोकांना वाचवण्यात आले, बचावकार्य सुरू

मुंबईतील (Mumbai) कुर्ला येथील नायक नगरमध्ये सोमवारी रात्री अचानक चार मजली इमारत कोसळली. सुरुवातीला 20 ते 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी आहेत. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ही इमारत जीर्ण झाली असून लोकांना ती रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस आणि अग्निशमन विभाग मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मदतकार्यात मदतीसाठी एनडीआरएफलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. उपकरणांसह एनडीआरएफचे जवान इमारतीचा ढिगारा साफ करण्यात आणि तोडण्यात गुंतले आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत एकूण 12 लोकांना वाचवण्यात आले आहे.

 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा