Now Loading

आसाम पूर: आसामच्या पुरामुळे 22 लाख लोक बाधित, भांगनामारी पोलिस स्टेशनची दुमजली इमारत बुडाली

आसाममध्ये (Assam) गेल्या अनेक दिवसांपासून पूरस्थिती आहे. पुरामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. सोमवारी पुरामुळे आणखी 8 जणांचा मृत्यू झाला. पुरात आतापर्यंत एकूण 135 जणांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, कचार जिल्ह्यात 5 जणांचा, कामरूप मेट्रो, मोरीगाव आणि नागावमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर कचार जिल्ह्यातून एक जण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. नलबारी जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या पुरात भांगनामारी पोलिस ठाण्याच्या दोन मजली इमारतीचा काही भाग पाण्याखाली गेला.

 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा